समुद्रामधल्या गडांचे कुतूहल नेहमीच आपल्याला असते . असाच एक समुद्रातला गड म्हणजे कोलाबा(कुलाबा).
अलिबाग च्या समुद्र किनाऱ्या वरून दृष्टीस पडणारा किल्ला. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण १ - २ किमी अंतरावर समुद्रात आहे.
सकाळी भरती च्या वेळी किल्ल्यावर जायचं असल्यास बोट शिवाय पर्याय नाही .
किल्ला :-
अप्सरा तलाव ----
अलिबाग च्या समुद्र किनाऱ्या वरून दृष्टीस पडणारा किल्ला. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण १ - २ किमी अंतरावर समुद्रात आहे.
सकाळी भरती च्या वेळी किल्ल्यावर जायचं असल्यास बोट शिवाय पर्याय नाही .
किल्ला :-
किल्ल्यावर जाण्याआधी आम्ही समुद्राचा आनंद लुटण्याचे ठरवले :)
समुद्रात मनसोक्त डुंबून झाल्यावर ओहोटी च्या वेळी आम्ही किल्ल्यावर जायचे ठरवले … तेव्हा ओहोटी मुळे
चालत जाणे शक्य होते .
इसवी सन १६८० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधल्याचे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या बोटींवर हल्ला करण्यासाठी या किल्ल्याच्या मुख्यत्वे उपयोग होत असे.
कालांतराने हा किल्ला कान्होजी आन्ग्रेंच्या ताब्यात आला. काही काळ त्यांच्या परिवाराच्या ताब्यात राहिल्यानंतर किल्ल्यावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते.
ताज्या पाण्याची विहीर या किल्ल्यामध्ये अजून आहे . काही स्थानिक लोकांनी तिथे लोकांना जेवण उपलब्ध व्हावे म्हणून स्वयंपाका ची व्यवस्था केली आहे . त्यासाठी सुद्धा हे लोक विहिरीचे पाणी वापरतात.
किल्ल्यावर बरीच मंदिरे आहेत ,भवानी आई मंदिर, पद्मावती मंदिर , महादेव मंदिर, गुलाबी मंदिर , बोपदेव मंदिर , त्यातील मुख्यत्वे सिद्धीविनायकचे मंदिर सुंदर आहे .
अप्सरा तलाव ----
अजून अनेक monuments या किल्ल्यावर आहेत , आंग्रे वाडा , नानीबाई आंग्रे चा वाडा (कान्होजी आंग्रेंच्या विधवा), तळघर , मुख्य कार्यालये , इत्यादी ।
किल्ल्ल्यावरून दिसणारे दृश्य :
सध्या किल्ल्याच्या डागडुजी ची जबाबदारी Archaelogical Survey of India (ASI) घेत आहेत त्यामुळे प्रवेश फी भरावी लागते :) त्यातल्या त्यात भारतीयांसाठी कमी आहे (५ रु) …परकीय नागरिकांसाठी फी (१०० रु)
पण हे मानावे लागेल कि किल्ला बर्यापिकी सुस्थितीत आहे …
परत येताना घोडागाडी करायचे ठरवले …. परत किनार्यावर येउन बसलो तेव्हा सूर्यास्त होत होता … वाह काय सुंदर दिसत होते दृश्य
wow snehal.... ek number. lay bhari...jhakkas
ReplyDeletephotos n information mast...keep it up
Thankss..... He pipcs mazya awdtya mob madhun kadhle ahet (LG Dynamite jo harvla :( ) mhnun chan ahet ....
Delete