जांबा अन् आंब्याच्या देशात - उत्तरार्ध

5 comments:
जांबा अन् आंब्याच्या देशात - पूर्वार्ध  येथुन पुढे
दिवसभराचा सर्वांना रापुन काढलेला प्रवास आणि बोंबलत फिरायची खाज आता कुठे थांबली.उन्हाने चांगलेच करपल्या गेलेलो.जयगड जेट्टीवर आमचा नंबर यायला अजुन बराच अवकाश होता.किल्ल्यावरुन निघताना रस्त्यावरचा "वेळणेश्वर 20 किमी" हा बोर्ड बघुन वाटलेलं,रस्ता असेल.पण नाही या मार्गात लागणाऱ्या जयगड ते तवसाळ या बोटफेरीचा हिशोब त्या 20 किमी मध्ये नसावा.असो,शेवटची बोटफेरी रात्री 10 ला असते ही नवीन माहिती मिळाली आणि आम्ही इथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे साधारण साढ़ेसहा झाले असावेत.या बोटफेरीने जवळजवळ 70 किमी चा गणपतीपुळे ते हेदवी असा भातगावमार्गे प्रवास कमी होतो.त्यामुळे गाडीत बुड टेकवुन बसायचा कंटाळा आला असेल तर ही जेट्टी म्हणजे तेराव्या महिन्यात लागलेली लॉटरीच.भुका लागल्या होत्या आणि नंबर यायला उशीर होता,थोडी पोटपूजा करून घ्यावी हा विचार करून शेजारीच असलेल्या हॉटेल मध्ये पाय टाकला. गरमागरम चपाती-आमलेट अन् फक्कड चहा! बेत आला जमून आणि प्रवासाचा सारा शीणच निघुन गेला.चहाची चव चाखून योगिता तर अमृत मिळाल्यासारखी आनंदली.चहा- आमलेटचा आस्वाद घेत बसलोय. 
© Sandip Wadaskar ।  © WTA | भटकंती…सह्याद्रीच्या कुशीत  । All Rights Reserved
खाडीतल्या छोट्या छोट्या लाटा वातावरणातला  जिवंतपणा वाढवत होत्या,बाकी सारे शांत-निवांत.हॉटेलवरही आम्हा चौघाशिवाय कोणी नाही.पलीकडे पॉवरप्लांटच्या प्रकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडून खाडीची शोभा वाढवत होतं.बोलता बोलता हॉटेलमालकाशी गप्पा रंगल्या,आंबे मिळतील का? याची चौकशी केली तर साळवीसाहेबांनी त्यांच्या बागेतलं फळ (अस्सल कोंकणी लोकं आंब्याला "फळ" म्हणतात) कसं बाधत नाही इथपासून ते झाडे लावताना मास्यांचा चुरा कसा टाकला इथपर्यंत.अंधारामुळे आता न दिसणाऱ्या झाडांचा जवळपास पाच वर्षांचा इतिहास डोळ्यांसमोर आला.त्यांच्या आजोबांपासुन चालत आलेली रोपं लावायची पूर्वापार पद्धत आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा,चांगली माहिती मिळाली. बराच वेळ चाललेलं साळवी साहेबांचं आंबा नैसर्गिकरीत्या कसा पिकवला जातो,या विषयावरील व्याख्यान माझ्या "आंबे कसे दिलेत,घ्यायचे होते?" या प्रश्नाने थांबलं.हुश्श! पण घरच्या वाडीतले आंबे संपले असल्यामुळे एक-दोघांना फोन करून जमवण्याचा त्यांचा निष्फळ प्रयत्न करून झाला,तोपर्यंत परतीची बोटफेरी जयगडाकडे येताना दिसली. साळवी साहेबांचा आणि आमलेट बनवून देणाऱ्या वाहिनींचा निरोप घेऊन बोटीत चढलो. आंबे मिळाले नाहीच.

दाभोळ खाडीच्या पार्श्वभूमीवर गोपाळगडाची तटबंदी

जांबा अन् आंब्याच्या देशात - पूर्वार्ध

No comments:
तुरुकवाडी! रस्त्यावरच्या डाव्या बाजूला ग्रामपंचायतीचं बोर्ड बघुन प्रसाद पुटपुटला,"आयला,हे नाव कुठंतरी वाचण्यात आहे " मग एकदम डोक्यात प्रकाशच पडला. हे तर पन्हाळा - विशाळगड  या मोहिमेत महाराजांनी पायाखाली तुडविलेल्या मातीचे गाव ! मनोमन नमस्कार झडला.आंबा घाटातल्या पितळी गोमुखातलं झिरपणारं पाणी घशाखाली उतरवून पुढे निघालोच तोवर विशालगडानेही दर्शन दिले. नावाप्रमाणेच आडवा पसरलेला गडमाथा गडदाखल होण्याचं आवतण देऊन गेला. त्याची उंचीही काही कमी थोडकी नव्हे ! उजवीला दरीपलीकडे हिरव्यागार वनश्रींने नटलेला चांदोली अभयारण्याचा माथा खुणावत गेला. निरभ्र आकाश,आंबा घाटाचा गुळगुळीत रस्ता आणि नेहमीप्रमाणे रंगलेला गप्पांचा फड,त्यात आमच्या रेश्मा मॅडमची रात्रीच्या झोपेची राहिलेली थकबाकी ! बाईसाहेब मध्येच जाग्या व्हायच्या आणि कुठे -कुठे किल्ला असं काहीबाही विचारायच्या. किल्ला तोपर्यंत घाटाच्या वळणावर नजरेआड व्हायचा.
एकंदरीत घाटातला सुंदर प्रवास जगतच आम्ही निघालो होतो आंब्याच्या देशात! चाखाया कोंकणचो राजा,फळांचा राजा. अनुक्रमे आंबा अन् दाभोळे घाट उतरून रत्नागिरीत प्रवेश केला तेव्हा मध्यान्हीचा सूर्यनारायण डोक्यावर वीज पडल्यासारखा तळपत होता.पुण्यातून पहाटे जरी निघालो असतो तरी देवाचा हा रोष टाळणं जरा मुश्किलच होतं.तरीही उन्हं पडायच्या आधीच घराचा उंबरठा ओलांडून निघायचा,आमचा बेत काही अंशी फसलेलाच.प्रवास हा जवळपास एक-सव्वा तास उशीराच सुरू होता.पूर्णगडाचा रस्ता विचारून त्या वाटेला लागलो तेव्हा घड्याळजी दीडच्या ठोक्यावर येऊन थांबलेले. रस्त्यावरूनच पावसच्या स्वामी स्वरूपानंदांना नमस्कार करून पूर्णगडाकडे मार्गस्थ झालो.
पूर्णगड वाडी - पारंपरिक जांबा दगडाची घरं